आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ आणि कर्णधार अव्वलस्थानी

virat-kohli
दुबई – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही चांगली कामगिरी केली आहे. सोमवारी आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ११६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर, दुस-या क्रमांकावर ११० गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजाच्या क्रमवारीत ९२२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, ८९७ गुणांसह न्यूझीलंडचा केन विलियमसन दुस-यास्थानी आहे. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यानंतर भारताच्या चेतेश्वर पुजाराच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली असून ८८१ गुणांसह पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतने या क्रमवारीत ६७३ गुणांसह १७ वे स्थान पटकावले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा गोलंदाजीच्या क्रमवारीत ८८२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर, इंग्लंडचा जेम्स अँडरसन ८७४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत भारताचा रवींद्र जडेजा ७९४ गुणांसह पाचव्या आणि रवीचंद्रन अश्विन ७६३ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. अश्विन क्रमवारीत फटका बसताना तो ३ क्रमांकांनी खाली आला आहे.

Leave a Comment