यावर्षाच्या अखेरीस अक्षय कुमार देणार आहे ‘गुड न्यूज’!

akshay-kumar
२०१९ हे वर्ष बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारसाठी जोरदार ठरणार आहे. त्याचे यावर्षात तब्बल चार चित्रपट निश्चितपणे रिलीज होणार आहेत. आता एक एका चित्रपटाच्या तारखा जाहीर होत आहेत. २१ मार्चला केसरी हा चित्रपट रिलीज होईल. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी दुसरा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यानंतरचा चित्रपट असेल गुड न्यूज.

६ सप्टेंबर रोजी गुड न्यूज हा चित्रपट रिलीज होणार आहे. ही बातमी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या सोशल मीडियावरुन दिली आहे.


अक्षयसोबत गुड न्यूजमध्ये करिना कपूरची जोडी पडद्यावर पाहायला मिळेल. यात दिलजीत दोसन्ज आणि कियारा अडवाणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्षनची निर्मिती असलेल्या गुड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करीत आहेत. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरू असून यापूर्वी सेटवरचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. अक्षय, करिनाच्या चाहत्यांसाठी चांगली गुड न्यूज आहे.

Leave a Comment