‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’चे दिग्दर्शन करणार आर. माधवन

R-madhavan
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असलेल्या नंबी नारायणन यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित चित्रपट येणार आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली असून ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात नंबी नारायणन यांची भूमिका आर. माधवन साकारणार आहे. त्याचबरोबर आता माधवनकडेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीदेखील आहे.


त्याने याबद्दलची माहिती चित्रपटाच्या पाटीचा एक फोटो शेअर करत दिली आहे. यासोबतच त्याने आपल्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज असल्याचेही म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणा-या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. चित्रपट काय आहे याबद्दलची उत्सुकता वाढवणारे निवेदन या टीझरमधून माधवनने केले होते.

‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट ‘ हा चित्रपट हिंदी, तामिळ, मळ्याळम आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे. नंबी नारायणन यांना १९९४ साली हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्ताऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Leave a Comment