आगामी चित्रपटात वारांगणेची भूमिका साकारणार विद्या बालन?

vidya-balan
प्रदीप सरकार यांच्या ‘परिणिता’मधून अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर विद्या आता पुन्हा प्रदीप सरकारसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘नीती बिनोदिनी’ असे असून विद्या यात ती वारांगणेच्या म्हणजेच वेश्येच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक बायोपिक असणार आहे. या चित्रपटाची कथा १९ व्या दशकातील बिनोदिनी या वेश्याच्या जीवनावर आधारित असणार आहे. या वेश्येला गिरीश चंद्र घोष यांनी नाटकात काम करण्याची संधी दिली होती. तिने ज्यानतंर वेश्या व्यवसाय सोडून दिला.

या चित्रपटातून वेश्यापासून कलाकारापर्यंतचा तिचा हाच प्रवास मांडला जाणार आहे. प्रदीप सरकार यांनी या रोलसाठी विद्या बालनकडे विचारणा केली आहे. याशिवाय विद्या लवकरच एनटीआर या बायोपिकमध्येही दिसणार आहे. या चित्रपटातून ती तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Leave a Comment