केस निर्यात बनवतेय भारत पाकची अर्थव्यवस्था मजबूत

export
घराघरातून दररोज सकाळी हमखास आणि दिवसभरात कधीही केरात फेकली जाणारी गुंतवळे आणि सलून मध्ये कापले जाणारे केस ही वास्तविक कवडीमोलाची वस्तू भारत आणि पाकिस्तान या देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत बनविण्यात मोठे योगदान देत आहेत हे वाचून कदाचित कुणी विश्वास ठेवणार नाही. पण ही वस्तुस्थिती असून भारत आणि पाकिस्तान केस निर्यात व्यवसायावर कब्जा मिळविण्यासाठी झगडत आहेत. त्यातही आपोआप गळलेल्या केसांना परदेशातून अधिक मागणी असून या केस निर्यातीतून अब्जावधी डॉलर्स कमावले जात आहेत. पाकिस्तानच्या खालच्या संसदेत या संदर्भातला एक अहवाल नुकताच सादर केला गेला. त्यानुसार पाकिस्तानने गेल्या ५ वर्षात केस निर्यातीतून १.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ११,४३,६०,००० रुपये कमावले आहेत.

पाकिस्तानमधील केसांना रशिया, चीन,अमेरिका आणि युएइ मधून मोठी मागणी आहे. युएस. जपान पाकिस्तानातील प्रीमियम क्वालिटीच्या केसांचे प्रमुख खरेदीदार आहेत. हे केस मनोरंजन उद्योगात वापरले जातात. जगभरात मानवी केस निर्यातीचा एकूण व्यवसाय ८१.२ दशलक्ष डॉलरचा आहे. भारतात हा व्यवसाय ३० जजर कोटींचा असून कोलकाता आणि चेन्नई मधील केसांना अधिक मागणी आहे. हे केस मोठ्या प्रमाणात चीनला निर्यात होतात.

केस निर्यात करताना प्रामुख्याने आपोआप गळून पडलेल्या केसांना पसंती दिली जाते कारण त्यांच्या वापर विग बनविणे किंवा केस ट्रान्सप्लांट साठी होतो. कोलकाता येथे होळीपूर्वी केसांना किलोला २ हजारपर्यंत दर मिळतो. गुजराथ मधील केसांना सर्वाधिक मागणी आहे कारण ते मजबूत आणि चमकदार असतात असेही समजते. तिरूपती देवस्थान दरवषी २२० कोटी रु. केस विक्रीतून कमावते आणि दरवषी त्यात वाढ होत आहे. नाताळनंतर निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरु होते आणि हा सिझन एप्रिल मे पर्यंत चालतो असे समजते.

Leave a Comment