न्यूझीलंड दौ-यासाठी अशी असणार विराट सेना

team-india
मुंबई – भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जोरदार कामगिरी करत आपल्या नावावर एकदिवसीय आणि कसोटी मालिका केली. भारतापुढे या यशस्वी वाटचालीनंतर आता न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २३ जानेवारीला नेपीयर येथे या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात येईल.

याही मालिकेला ‘कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने निलंबनाची कारवाई भोगत असलेले हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल मुकणार आहे. या दोघांच्या जागी विजय शंकर आणि शुभमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. तसेच शुभमन गिल या मालिकेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असल्याने या मालिकेत तो भारतीय संघाचा भाग नसेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ – विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी, विजय शंकर, शुभमन गिल.

Leave a Comment