
पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मटका लागतो कधी कधी, या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रिपदाची बंपर लॉटरी पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना लागली. जावडेकरांना घराच्या शेजारीही कोण ओळखत नाही, अशी जहरी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली.
संजय काकडेंचा प्रकाश जावडेकरांवर पलटवार
पाच कार्यकर्ते मागे नसतानाही प्रकाश जावडेकरांना तर मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागली. जावडेकरांना घराच्या शेजारीही कुणी ओळखत नाही. त्यांना 2019 च्या निवडणुकीत कळेल मटका की सर्व्हे आहे. एक नगरसेवकही जावडेकर निवडून आणू शकले नाहीत. कार्यकर्तेही घडवू शकले नाहीत. पण जावडेकर यांना यानंतरही केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. ही तर बंपर लॉटरी असल्याचा निशाणा संजय काकडे यांनी प्रकाश जावडेकर यांच्यावर साधला. तसेच, जावडेकरांचा पक्षासाठी केलेला त्याग देशाला आणि राज्याला माहिती असल्याचा टोमणाही खासदार काकडे यांनी लगावला.
