चंद्र ग्रहणाच्या वेळी का ओरडतात लांडगे ?

super-blood-wolf
या वर्षीचे पहिले चंद्र ग्रहण आज म्हणजेच 21 जानेवारीला असणार आहे. या चंद्र ग्रहणाला सुपर ब्लड वुल्फ मून देखील म्हटले जाते. आपण बहुतेकदा चित्रपटांमध्ये किंवा प्रत्यक्षातही पाहिले असेल आकाशात लाल रंगाच्या चंद्राला पाहिल्यावर लांडगा ओरडू लागतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का ? यामागील नेमक काय कारण आहे.
super-blood-wolf1
नासाच्या मते, सुपर मून इतर दिवसांच्या तुलनेत पृथ्वीच्या खुप जवळ असतो म्हणजेच 3,63,000 किमीच्या अंतरावर असते. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वात दुर अंतरावर असतो, तेव्हा त्याच्या मधील अंतर 4,05,000 किमी एवढे असते. चंद्रावर होणाऱ्या या संपूर्ण घटनेला नासाने मोस्ट डॅजलिंग शो म्हणजेच सर्वात प्रकाशित शो म्हटले गेले आहे.
super-blood-wolf2
नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या रिसर्च साइंटिस्ट डॉ. नोआह पेट्रोच्या मते, सुपर मूनच्या दिवशी चंद्र हा इतर सामान्य दिवसांच्या तुलनेत 14 टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. यावेळी चंद्र लाल तांबुस रंगा सारखा दिसतो, म्हणूनच चंद्राला ब्लड मून असे ही म्हटले जाते.
super-blood-wolf3
ग्रहणाच्या वेळी चंद्रचा रंग बदलतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चंद्रचा या रंग बदण्याच्या मागील कारण म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून चंद्रावर पडतो. ग्रहांची सावली पडल्यामुळे चंद्राचा रंग बदलतो.
super-blood-wolf4
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या खगोलीय घटनांच्या संयोगाने तयार झालेले चंद्र ग्रहण रात्रीच्या वेळी अद्भुत दृश्य आकाशात दिसते. दरम्यान, यावर्षी भारतात चंद्र ग्रहण दिसणार नाही. परंतु ज्या भागात हे ग्रहण दिसेल त्या ठिकाणी कोणत्याही उपकरणाशिवाय डोळ्यांनी हे ग्रह पाहिले जाऊ शकतात.
super-blood-wolf5
अमेरिकेत या ग्रहणाला वूल्फ मून यांच्या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री अन्नाच्या शोधत निघालेले लांडगे आकाशात लाल रंगाच्या चंद्राला पाहून मोठ-मोठ्याने ओरडू लागतात. यामुळे या चंद्र ग्रहणाला वुल्फ मून देखील म्हटले जाते.

Leave a Comment