भारतीय नागरिकत्व मेहुल चोकसीने सोडले!

mehul-choksi
नवी दिल्ली : केंद्र सरकारला साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यात मोठा झटका बसला आहे. भारतीय नागरिकत्व घोटाळ्याचा प्रमुख आरोपी मेहुल चोकसीने सोडले आहे. आपला भारतीय पासपोर्ट चोकसीने अँटिग्वा उच्च आयोगात जमा केला आहे. याचाच अर्थ आता चोकसीला भारतात आणणे आणखी कठीण झाले आहे.

पासपोर्ट नंबर झेड 3396732 कॅन्सल्ड बुकसोबत मेहुल चोकसीने जमा केला आहे. नागरिकत्व सोडण्यासाठी चोकसीने 177 अमेरिकन डॉलरचा डीडीही जमा केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाला याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी दिली. चोकसीने नागरिकत्व सोडण्याच्या अर्जावर त्याचा नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस अँटिग्वा, असा लिहिला आहे. नियमानुसार मी अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले असून मी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याचे चोकसीने उच्च आयोगाला सांगितले आहे.

मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व प्रत्यार्पणाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सोडले आहे. अँटिग्वा कोर्टात याबाबत 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि तपास यंत्रणांकडे या प्रकरणाचा प्रगती अहवाल मागितला आहे.

Leave a Comment