लवकरच विवाहबद्ध होणार हार्दिक पटेल

hardik-patel
अहमदाबाद : 26-27 जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आसल्याची माहिती मिळाली असून सुरतच्या किंजल पटेलसोबत सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या डिगसरमध्ये हार्दिकचा लग्नसोहळा पार पडणार असल्याची माहिती हार्दिकचे वडील भारतभाई पटेल आणि निकटवर्तीय निखील सवानी यांनी दिली.

अहमदाबाद जिल्ह्याच्या वीरमागामची किंजल पटेल ही मूळची रहिवासी आहे. पण ती सध्या तिच्या कुटुंबियांसोबत सुरतमध्ये राहते. तर विरमागाममधील चंदन नगरी हे हार्दिकचे मूळगाव आहे. अजूनही हार्दिकने लग्नाबाबत अधिकृत काहीही सांगितलेले नाही. पण त्याच्या वडिलांनी लग्नाची तयारी जोरात सुरु असल्याचे सांगितले.

दोन दिवसांचा हा लग्नसोहळा असणार आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाला 50 ते 60 लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पारंपरिक आणि साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. हार्दिकच्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चावरुन यापूर्वी चांगलीच चर्चा झाली होती. हार्दिक वयाच्या 25 व्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. किंजल हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. किंजल परिख-पटेल असून तिने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहे.

Leave a Comment