कराचीमध्ये गाड्या पार्क करण्याचे काम करत आहे सलमान खान!

salman-khan
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानसारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान व्हिडिओ शेअर करणाऱ्या ट्विटर युझरने दावा केला आहे की पाकिस्तानच्या कराची शहरात सलमान खानसारखाच दिसणारा एक व्यक्ती दिसतो. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की कराचीच्या गोल्डन मार्केटमध्ये सलमानसारखा दिसणारी ही व्यक्ती दिसली. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हा सलमानच नाही, याची खात्री पटणार नाही.

कराचीच्या बाजारात पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकल एका ठिकाणी व्यवस्थित उभ्या करायला सलमानसारखीच हेअर स्टाईल आणि बॉडी असणारी ही व्यक्ती मदत करत आहे. ही व्यक्ती कोण आहे? आणि तो येथे काय करत आहे? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, ही व्यक्ती सलमानसारखीच दिसत असल्याने भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Comment