भाजपच्या महिला आमदाराने मायावतींना किन्नर संबोधले!

mayawati
नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींवर भाजपच्या महिला आमदार साधना सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकारणात गोंधळ उडाला आहे. सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथून आमदार असलेल्या साधना यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. साधना सिंह यांनी त्यामध्ये मायावतींवर एकानंतर एक अतिशय वादग्रस्त शब्दात टीका केली. सोबतच, तृतीयपंथियांपेक्षा मायावती वाईट असल्याचे म्हटले आहे. मायावतींचे गेस्ट हाऊस घोटाळ्यात चीरहरण झाले होते तरीही त्यांनी आघाडी केली अशा शब्द साधना सिंह यांनी उगारले आहेत.

मायावतींवर आमदार साधना सिंह यांनी अनेक स्वरुपाच्या टीका केल्या. त्या एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना म्हणाल्या, आम्हाला वाटते की माजी मुख्यमंत्री महिला किंवा पुरुष हे दोन्ही नाहीत. आपल्या सन्मानाशी त्यांना काहीच घेणे-देणे नाही. द्रौपदीचे सुद्धा चीरहरण झाले होते. त्या चीरहरणाचा बदला द्रौपदीने घेतला होता. त्या एक स्वाभिमानी महिला होत्या. आजची एक महिला आहे जिचे सर्वच काही लुटले गेले आणि तरीही खुर्ची मिळवण्यासाठी तिने आपले मान-सन्मान विकले. आम्ही या कार्यक्रमात अशी महिला असलेल्या मायावतींचा तिरस्कार करतो. नारी जातीवर त्या कलंक आहेत. साधना सिंह यांनी यानंतरही इतक्या निच्च पातळीवर जाऊन टीका केली की ती सांगणे सुद्धा कठिण आहे.

Leave a Comment