मालकाचा बदला घेण्यासाठी कुत्राने केला 9 दिवस प्रवास… पण का

dong
कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र आम्ही आज तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहेत. की ती ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही कधी ऐकले आहे का? कुत्र्याने आपल्या मालकाचा बदला घेण्यासाठी 9 दिवसात 100 किमी प्रवास पुर्ण केला आणि मालक दिसताच त्याचा चावा घेतला. हे ऐकूण विचित्र वाटेल मात्र हे सत्य आहे.
dong1
ही घटना अमेरिकातील न्यू मेक्सिकोमधील आहे. एका कुत्र्याने तब्बल 100 किमी अंतर कापून मालकाचा बदला घेण्यासाठी पोहोचला. दरवर्षी सॅंटियागो मार्टिनेज हे सुट्टी घालविण्यासाठी अल्बयूक्रेन येथे जातात, परंतु यावेळी त्यांनी आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन गेले नाही कारण त्यांना कुत्र्याचा कंटाळा आला होता.
dong2
मार्टिनेजला जरा सुध्दा अंदाज नव्हता की, त्यांचा कुत्रा त्याला शोधत-शोधत समुद्र किनारी येईल जिथे ते सुट्टी घालविण्यासाठी आले होते. मार्टिनेजचा कुत्रा 9 दिवस मागोवा घेत 100 किमी अंतर कापून आपल्या मालकाजवळ पोहोचला.
dong3
अल्बयूक्रेनमध्ये सुट्टीसाठी आलेले मार्टिनेज यांना आपल्या कुत्र्याला पाहून आश्चर्याचा धक्का बसला. मार्टिनेज कुत्र्याला बघताचा मिठी मारली, परंतू कुत्रा खुप रागात असल्याने त्याने मालकाला चावा घेतला. हे बघून मालकाला रडायला आले. पण नंतर कुत्रा मालकाच्या भोवती फिरु त्याला प्रेमाने चाटू लागला.