चेतावणी देऊनही उघडण्यात आली 2000 वर्ष जूनी रहस्यमय कबर

mummy
आपण ममीबद्दल तर ऐकलेच असेल. यात मृत शरीरावर लेप लाऊन त्याला अनेक वर्ष जतन करुन ठेवले जाते. ते सुरक्षित ठेवण्याची प्रक्रियेला ममी असे म्हटले जाते. प्राचीन इजिप्तमध्ये आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांची मम्मी तयार करुन त्यांना अनेक वर्ष ठेवले जात होते. काही दिवसापुर्वीच 2000 वर्षापूर्वी मम्मीशी संबंधित एक भयंकर बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आपण देखील ऐकू थक्क व्हाल.
mummy1
इजिप्तच्या एलेक्जेन्डि्रिया शहरात नऊ फिट खोल रहस्यमय दगडांची कबर चेतावणी देऊन ही उघडण्यात आली आहे. या कबरी विषयी चेतावणी अशी होती की ही एक शापित कबर आहे, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. परंतु चेतावणी देऊन ही कबर उघडण्यात आली. 2000 वर्ष जुनी या कबरेत शोधकर्त्यांना तीन ममी सडलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. या तीन ममी काळ्या दगडापासुन बनलेल्या कबरीत अतिशय घाण पाण्यावर तरंगताना मिळल्या. दरम्यान, एलेक्जेन्डि्रिया या शहराचा सर्वात मोठा शोध समजला मानला जात आहे.
mummy2
अनेक लोकांमध्ये याबाबत अशी भीती होती कारण ही एक शापित होती. जेव्हा 1922 मध्ये राजा तुतनखामूनची कबर उघडली गेली. तेव्हा काही काळानंतर त्याच्याशी संबंधित अनेक लोकांचा मृत्यु झाला. तेव्हापासून अशी अफवा पसरली ही एक शापित कबर आहे. इजिप्तच्या सुप्रीम काउंसिल ऑफ एंटीक्विटीजचे महासचिव मुस्तफा वजीरी म्हणाले की, कबर उघडण्यात आली आहे आणि आतापर्यंत कोणालाही शापाने कोणतेही नुकसान झाले नाही.
mummy3
कबरांमध्ये आढळलेली तीन ममी रोमन शाही कुटुंबातील सदस्य नाहीत कारण चांदी किंवा सोन्याचे कोणतेही मास्क सापडलेले नाहीत. असे म्हटले जाते की, तीन ममी सैनिकांचे असू शकतात कारण तीन ममी पैकी एका ममीच्या ङोक्याला जखम आहे.

Leave a Comment