एका मुस्लिम मूर्तिकाराने साकारली जगातील सर्वांत उंच दुर्गामातेची मूर्ती

durga
जगातील सर्वाधिक उंच दुर्गा मातेची मूर्ती साकारण्याचा विक्रम एका मुस्लिम मूर्तिकाराने केला आहे. त्यांचे नाव नुरुद्दीन अहमद असे असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. कलाकाराला कोणताही धर्म नसतो, असे सांगत उच्च कोटीचा सामाजिक संदेशही एका हिंदू देवतेची मूर्ती साकारणाऱ्या या मुस्लिम कलाकाराने दिला आहे.
durga1
गुवाहाटीचे काहिलीपाडा भागातील अहमद हे रहिवासी आहेत. गुवाहाटीतील विष्णुपूरमध्ये त्यांनी सप्टेंबर २०१७साली बांबूपासून ९८ फूट उंच दुर्गामातेची मूर्ती साकारली होती. त्यांच्या या कामगिरीची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. अहमद यावर बोलताना म्हणतात, माझ्या कामाचे कौतुक अनेक लोक करतात, मला त्रासही देत नाहीत. पण काही लोक मला जाणीवपूर्वक विचारतात की या कामामध्ये माझा धर्म अडथळा ठरत नाही का? पण त्यांना मी सांगतो की, यात धर्माची बाब येते कुठून. कलाकारांचा कोणताही धर्म नसतो.
durga2
हिंदू आणि मुसलमान या दोन्हीही समुदायांच्या ४० लोकांनी मिळून सप्टेंबर २०१७ मध्ये अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली ती विशाल मूर्ती बनवली होती. विष्णुपूरामध्ये ती मूर्ती पाहण्यासाठी एक लाख लोक आले होते. केवळ ७ दिवसांमध्ये अहमद यांनी ही मूर्ती बनवली होती. अहमद म्हणाले, आम्ही ४० दिवस ही मूर्ती साकारण्यासाठी निश्चित केले होते. त्यानुसार ती १७ सप्टेंबरपर्यंत तयारही झाली होती. पण दुर्गा पुजेच्या आठवडाभर आधीच एका वेगाने आलेल्या वादळामध्ये या मूर्तिची मोडतोड झाली. त्यानंतर आठवड्याभराचे आव्हान पेलत आम्ही पुन्हा सुरुवातीपासून ती साकारली.

Leave a Comment