अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधनामुळे दीपिकाने नाकारला चित्रपट

deepika-padukone
अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रींना दिल्या जाणाऱ्या कमी मानधनावर ठोस भूमिका घ्यायला आता दीपिकाने सुरूवात केली आहे. दीपिकाने नुकताच एक चित्रपट मानधनात कोणत्याही प्रकारची तडजोड यापुढे केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत नाकारला आहे.

चित्रपटाची कथा मला खूपच आवडली. चित्रपटाला माझा होकारही होता पण मला अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधन दिल्याने मी चित्रपट नाकारला. माझी किंमत मला ठाऊक असल्याचे दीपिकाने नुकतेच एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले आहे. मला कोणत्या चित्रपटासाठी किती मानधन घ्यायचे हे चांगलेच माहित आहे. माझा अभिनय, माझे काम या सर्वांची मला कल्पना असल्यामुळे माझ्या कामाला अनुसरूनच मी मानधन मागते. मी यापुढे मानधनाच्या बाबतीत कोणतीच तडजोड करणार नाही. कोणाला किती मानधन दिले जाते याची कल्पना प्रत्येकाला असते मलाही आहे.

मला एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो हेही माहिती असल्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मी मानधन मागते. पण अभिनेत्याला जर जास्त मानधन द्यायचे आहे म्हणून तुम्हाला कमी मानधन देत आहे असे जर मला कोणी सांगितले तर मी हे खपवून घेणार नाही, तर मी मानधनाच्या बाबतीत कधीच तडजोड करणार नाही, अशा शब्दात काही दिवसांपूर्वी दीपिकाने बॉलिवूडमधील मानधनाच्या तफावतीबद्दल आपली रोखठोक भूमिका मांडली होती.

Leave a Comment