
मुंबई – मोदी सरकारवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदींना काँग्रेसने छळले, म्हणून जनतेला मोदी छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे. नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. काँग्रेसने मला गुजरातचा मुख्यमंत्री असताना छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. राज ठाकरेंनी या विधानाच्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र रेखाटले आहे. मला काँग्रेसने छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.
राज ठाकरे यांची मोदी सरकारवर पुन्हा एकदा व्यंगचित्रातून टीका
#NarendraModi #Congress #Harassment #IndianCitizen #RajThackeray #PoliticalCartoon pic.twitter.com/j5XXRhDXTP
— Raj Thackeray (@RajThackeray) January 19, 2019
याआधी संक्रांतीला पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले होते. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत होते. 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला होता.
