एका ईमेलने देशातील मोठ्या फार्मा कंपनीने गमावले 12 हजार कोटी

sun-pharma
नवी दिल्ली- आपल्या वडिलांकडून फक्त 10 हजार रूपये उधार घेऊन एका व्यक्तीने व्यवसाय सुरू केला होता, जो 32 वर्षांनंतर आता अब्जाधींशाचा बिझनेस एम्पायर बनला आहे. कंपनीचे अंदाजे 12 हजार कोटी रूपये शुक्रवारी फक्त एका ईमेलने बुडाले आहेत. देशातील सगळ्यात मोठी फार्मा कंपनी सन फार्मा (Sun Pharma) आणि त्याचे मालक दिलीप सांघवी बद्दल आम्ही बोलत आहोत.

दिलीप सांघवी यांनी मेहनतीच्या जोरावर अब्जावधींचे साम्राज्य तयार केले आहे. त्यांची फार्मा कंपनी सनफार्मा सगळ्यात महत्त्वाची आहे. 32 वर्षांपूर्वी त्यांनी 1983 साली आपल्या वडिलांकडून 10,000 रूपये उधार घेऊन सन फार्माची सुरूवात केली होती. सन फार्माने सुरूवातीला फक्त 5 प्रोडक्टच बाजारात आणले होते, पण हीच कंपनी आज देशातील सगळ्यात मोठी फार्मा कंपनी आहे. 1 दिवसापूर्वी या कंपनीचे मार्केट व्हॅल्यू अंदाजे 1 लाख कोटी होते. 1955साली गुजरातमध्ये जन्मलेले सांघवी यांच्याकडे सन ग्रुपच्या तीन कंपनीमध्ये 63 टक्के भागीदारी आहे.

सांघवी यांची कंपनी सन फार्मावर काही दिवसांपूर्वी अनेक आर्थिक अनियमिततेचे आरोप लावण्यात आले. मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ला एक व्हिशलब्लोअरने एक नवीन तक्रार पाठवली. कंपनीचे शेअर्स त्यानंतर 12 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर कंपनीची व्हॅल्यू 90 हजार कोटी रूपयांवर आली.

याबाबत एका फायनांशिअल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सन फार्माविरूद्ध एक व्हिशलब्लोअरने नवीन तक्रार सेबीला पाठवली. वर्ष 2014 आणि 2017 दरम्यान आदित्य मेडिसेल्स आणि सन फार्माच्या प्रमोटर्सची प्रायवेट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रांझॅक्शंस झाले असल्याचे त्यात म्हटले होते. रिपोर्टनुसार, एक व्हिशलब्लोअर द्वारे सन फार्माविरूद्ध मार्केट रेग्युलेटर सेबीला पाठवण्यात आलेल्या तक्रारीत आरोप लावले की, 2014 आणि 2017 दरम्यान फक्त तीन वर्षात आदित्य मेडिसेल्स (एएमएल)आणि सन फार्माचे को-प्रमोटर सुधीर वालियाचे कंट्रोल असलेली सुरक्षा रियल्टीसोबत 5800 कोटी रूपयांचे ट्रांझॅक्शन झाले आहे.

बीएसइ (BSE) मध्ये या बातमीनंतर सन फार्माचा स्टॉक 12 टक्क्यांनी घसरला. मागच्या दोन ट्रेडिंग सेशंसबद्दल सांगायचे झाले तर अंदाजे 17 टक्क्यांनी कंपनीचे शेअर घसरले आहे. शेअरच्या 375 रूपयांच्या लो हिशोबाने कंपनीची मार्केट व्हॅल्यूमध्ये अंदाजे 12 हजार कोटी रूपये कमी दिसत आहेत. मागच्या दोन दिवसांत कंपनीची व्हॅल्युएशन अंदाजे 18,702 कोटी रूपयांनी घसरली आहे. या बातमीमुळे ग्रुपच्या इतर कंपन्या एसपीआरसी (सन फार्मा एडवांस्ड रिसर्च कंपनी) चे शेअर बीएसईवर 158 रूपयांसोबत 52 आठवड्यांच्या लोवर आले आहेत.

Leave a Comment