धनाढ्य शहरामधील लोक रहातात चक्क खुराड्यात

hongkong
हाँगकाँग या शहराचे नाव जगातील सर्वात धनाढ्य शहरांमध्ये घेतले जाते. 56,701 डॉलर (38 लाख रुपये) एवढे येथील प्रत्येक एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न आहे. तरीही प्रत्यक्षात येथे राहणाऱ्या माणसांची अवस्था जनावरांपेक्षा वाइट आहे. लोखंडी तारा आणि गजाळ्यांनी बनलेल्या पिंजऱ्यांमध्ये लाखोंच्या संख्येने लोक राहतात. तर क्युबिकल अर्थात 6*4 फुट आकाराच्या डब्यांमध्ये एका पलंगावर काही लोक आपले आयुष्य घालवतात.
hongkong1
सध्याच्या घडीला येथे राहण्यासाठी जागाच उरली नाही. असलेली घरे खूप महागडी असल्याने ते सर्वांना खरेदी करणे तर दूर भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही. साधी आरसीसीची घरे सुद्धा खूप महाग असल्यामुळे गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांसाठी 6 फुट लांब आणि 3 फुट रुंद अशा पिंजऱ्यांमध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पिंजरे किंवा शवपेट्या म्हटल्या जाणाऱ्या या खोल्या सुद्धा काही स्वस्त नाहीत. या खोल्यांमध्ये राहण्यासाठी सुद्धा त्यांना किमान 11,500 रुपये दरमहा द्यावे लागतात. सिंगल बेडरूम असलेल्या साध्या फ्लॅटच्या किंमती तर दूरच तेथे राहण्यासाठी सुद्धा सव्वा लाख रुपये मासिक भाडे द्यावे लागते.
hongkong2
1950 आणि 60 च्या अशा प्रकारच्या घरांमध्ये राहण्याची सुरुवात दशकात झाली. येथे चिनी यादवीनंतर मोठ्या संख्येने शरणार्थी पोहोचले. हाँगकाँग शहराची लोकसंख्या त्यावेळी 20 लाखांच्या पुढे गेली. लोकसंख्या वाढत असताना येथे राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे, लोक क्युबिकल होम्स अर्थात डब्यांमध्ये राहायला लागले. अशा प्रकारच्या घरांची संख्या 1990 पर्यंत हजारोंमध्ये होती. ती 1997 पर्यंत लाखांवर गेली. हाँगकाँगमध्ये पिंजऱ्यांचे घर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या घरांना कायदेशीर परवानगी नाही.
hongkong3
हाँगकाँग सरकारने सांगितल्याप्रमाणे, सरकारी घरांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी दोन लाखांहून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी निम्मे नागरिक सिंगल आहेत. सरकारी आवास मिळवण्यासाठी त्या सर्वांना आणखी किमान 3 वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment