आता तुमच्या जीभेचे चोचले देखील पुरवणार पेटीएम !

paytm
नवी दिल्ली – एक नवीन सेवा देण्याचे डिजिटल व्यवहार करणाऱ्या पेटीएम कंपनीने ठरविले आहे. केवळ पैशांची देवाण-घेवाण पेटीएम अॅपच्या माध्यमातून केली जाते. पण पेटीएम युजर्सला पेटीएमच्या नव्या सेवेमुळे फूड ऑर्डर करता येणार आहे. बाजारात फूड सेवा पुरवणारी झोमॅटो कंपनीशी पेटीएम कंपनीने भागिदारी केली. तसेच या सेवेचा पेटीएमच्या अॅपवर लाभ घेता येणार आहे. दिल्ली- एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएमच्या ऍन्ड्राइड अॅपवर ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण भारतात ही सेवा कार्यरत होणार आहे.

पेटीएम कंपनीने सांगितले की, पैशांची देवाण-घेवाण पेटीएम अॅपच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. पेटीएम अॅप वापरकर्त्यांच्या प्रमाणात या कारणाने मोठी वाढ झाली आहे. पेटीएमने नोटाबंदीच्या काळात लोकांना योग्य सेवा प्रदान केल्यामुळे आपल्या युजर्सकडून पेटीएम अॅपने चांगलीच पसंती मिळवली होती. तसेच पेटीएम युजर्सच्या प्रमाणात या नवीन फिचरमुळे आणखी भर पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे’.

माहितीनुसार, केवळ १०० शहरांत, ८० हजारांपेक्षा अधिक हॉटेलमधून झोमॅटो कंपनी फूड सेवा प्रदान करते. मागच्या महिन्यात कंपनीने २ कोटी ८० लाखाची फूड डिलिव्हरी केली होती. संपूर्ण भारतात १ लाख ५० हजार डिलिव्हरी कामगार आहेत. जे ग्राहकांनी केलेल्या ऑर्डरची डिलिव्हरी करतात.

Leave a Comment