लवकरच विवाहबद्ध होणार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर

arjun-kapoor
बी-टाऊनमध्ये सध्याच्या घडीला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाचे किस्से चर्चेचा विषय ठरत आहे. पण दोघांनी अद्यापही त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही. मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून वाऱ्या सारख्या पसरत आहेत. दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचे दिग्दर्शक करण जोहरने सांगितले. मलायका अर्जुन सध्या आपल्यासाठी घर शोधत आहेत. याच आधारावर दोघे लग्न करणार असल्याचे समजत आहे. दोघे घराच्या शोधात काही बिल्डर्सला भेटले आहेत.लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ त्यांनी घर खरेदी केले. अर्जुन- मलायका लग्नानंतर त्याच घरात रहाणार आहेत.

नुकताच हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये आले होते. त्याचवेळी माझे मलायकावर क्रश होते पण आता नाही असे वक्तव्य राहुलने केले होते. करणने, त्यावर अर्जुन कपूर मलायकाला डेट करत आहे म्हणून का? असे विचारले. आपल्या नात्याला अर्जुन कपूरने सुद्धा हिरवा कंदील दाखवला आहे.अर्जुनला, तुम्ही सिंगल आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्याने आपण सिंगल नसल्याचे सांगितले.

Leave a Comment