
आपल्या बम्पर ब्लॉकबस्टर ‘बाहुबली’च्या प्रदर्शनानंतर प्रभास सुपरस्टार्सच्या यादीत सहभागी झाला आहे. या चित्रपटाने संपूर्ण जगातील लोकांची मने जिंकली. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचले. प्रभासच्या आगामी ‘साहो’ची आता चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभासचा हा अगदी बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. स्टार कास्टमुळे आणि सेट्समुळे हा चित्रपट कायमच चर्चेत राहिलेला आहे. पण आम्ही तुम्हाला आता जी माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्हाला आणखी आनंद होणार आहे. ‘बाहुबली’मुळे सुपरस्टार ठरलेला प्रभास या चित्रपटात इंग्रजी बीट्सवर ठेका धरताना दिसणार आहे.
बियॉन्सेच्या गाण्यावर थिरकणार प्रभास
यासंदर्भात बॉलिवूडलाईफने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटातून प्रभास प्रेक्षकांचे डबल मनोरंजन करणार आहे. प्रभासचे जबरदस्त ऍक्शन तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पण त्यासोबत त्याचा डान्सिंग अवतार देखील पाहायला मिळणार आहे. तसेच प्रभासला नाचवणे ही काही सामान्य गोष्ट नाही. म्हणून हॉलिवूड गायक बियॉन्सेच्या गाण्यावर प्रभास थिरकताना दिसणार आहे.
या चित्रपटात बियॉन्से दिसणार नाही पण तिच्याच गाण्यावर प्रभास ठेका धरणार आहे. एक गाणे देखील ‘साहो’करता शूट केले जाणार आहे. त्याकरिता अतिशय रॉयल सेट बनवला जाणार आहे. येथे डान्स करता कार्निवल थीम असून ब्राझीलमधून स्पेशल डान्सर बोलवण्यात आले.
