सामान्य ग्राहकांसारखीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने बर्गरसाठी लावली चक्क रांग!

bill-gates
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बिल गेट्स हे ओळखले जातात. आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी सढळहस्ते मदत निधी दिला आहे. या व्यक्तीचे साधे राहणीमान अनेकांना आपल्याकडे आकर्षित करते. सध्या वाऱ्याच्या वेगाने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लक्ष्मी ज्याच्या पायाशी लोळण घालते असा अब्जाधीश सर्वसामान्यांप्रमाणेच चक्क एका बर्गरसाठी रांगेत उभा असलेला या फोटोत दिसत आहे.

बिल यांचा ‘डिक्’चा बर्गर सर्वात आवडता बर्गर असल्यामुळे बिल यांनी या बर्गर चेन स्टॉल बाहेर सामान्य ग्राहकांसारखीच रांग लावत बर्गर आणि कोक खरेदी केला. बिल गेट्स यांचा हा फोटो मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Leave a Comment