थंडीच्या दिवसांमध्ये आहारामध्ये अवश्य समाविष्ट करा साजूक तूप

ghee
थंडीच्या दिवसांमध्ये आपला आहार, इतर ऋतुंमध्ये असलेल्या आहाराच्या मानाने काहीसा वेगळा असतो. ताज्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या,आणि फळे या ऋतूमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या सर्व पदार्थांच्या सोबतच या दिवसांमध्ये आहारामध्ये साजूक तूपही समाविष्ट केले जावे असा सल्ला आयुर्वेद देतो. थंडीच्या ऋतूमध्ये साजूक तुपाचे सेवन हे शरीराला पोषण देणारे आहे. याच्या सेवनाने शरीराला थंडीच्या दिवसांमध्ये आवश्यक असलेली उष्णता मिळत असते. साजूक तुपाला ‘ब्रेन फूड’ही म्हटले जाते, कारण याचे सेवन मेंदूच्या कार्यासाठी अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. साजूक तुपामध्ये असणारे अ जीवनसत्व डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. साजूक तूप ‘आय प्रेशर’ नियंत्रित करीत असून, ज्या व्यक्तींना ग्लॉकोमा आहे, त्यांच्यासाठी साजूक तुपाचे सेवन उपयुक्त आहे. सर्दी पडसे होऊन जर नाक सतत बंद असले, तर नाकामध्ये काही थेंब साजूक तूप घातल्याने नाक मोकळे होते. आयुर्वेदामध्ये या उपायाला ‘न्यासा’ म्हटले गेले आहे. एखाद्या आयुर्वेद विशेषज्ञाच्या मदतीने ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घेता येऊ शकते.
ghee2
थंडीच्या दिवसांमध्ये तूप खाल्ले जावेच, तसेच या दिवसांमध्ये कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी देखील साजूक तूप उत्तम आहे. यामध्ये असलेल्या स्निग्ध पदार्थांमुळे त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळून त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते. तसेच सुंदर त्वचेसाठी साजूक तुपाचा वापर करून बनविलेला फेस पॅक उपयुक्त ठरतो. हा फेस पॅक बनविण्यासाठी दोन चमचे साजूक तूप, दोन चमचे बेसन आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करावे आणि याची घट्ट पेस्ट तयार करावी. हे पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे ठेवावी आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. आठवड्यातून तीन वेळा हा फेस पॅक लावावा.
ghee1
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसोबत केसही कोरडे होऊन त्यामध्ये कोंडा होऊ लागतो. त्यासाठी देखील साजूक तूप उपयुक्त असून, साजूक तुपाने केसांच्या मुळांशी मसाज केल्यास केसगळती थांबते आणि केसांतील कोंडा देखील दूर होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही