‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये भूमी पेडणेकर

bhoomi-pednekar
लवकरच ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा झळकणार आहे. संजीव कपूर यांनी १९७८साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आता कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.

या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत करण्यात येणार आहे. ‘पती पत्नी और वो’, हेच या चित्रपटाच्या रिमेकचेही नाव राहणार आहे. फक्त कथेत काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.


कार्तिक या चित्रपटात पहिल्यांदाच अनन्या पांडे आणि भूमीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आपल्या इन्स्टाग्रावर भूमी पेडणेकर हिने देखील तिघांचाही फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात सुरूवातीला तापसी पन्नु झळकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण नंतर अनन्याची वर्णी या चित्रपटात लागली आहे. तापसीने याबाबत खंतही व्यक्त केली होती. पण तापसीसोबत चित्रपट निर्मात्यांनी फक्त चर्चा केल्याचा खुलासा केला आहे. या चित्रपटात तापसीला घेण्याबद्दलचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. अनेक कलाकारांशी चित्रपटाच्या स्टारकास्टसाठी चर्चा करण्यात आली होती. त्यात तापसी देखील होती. तापसी खूप चांगली अभिनेत्री आहे. भविष्यात तिच्यासोबत नक्की काम करू, असेही निर्मात्यांनी म्हटले आहे.