
बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारात २०१९ बीएमडब्ल्यू आर १२५० जीएस आणि आर १२५० जीएस अॅडव्हेन्चर अश्या दोन बाईक लाँच केल्या असून त्या दोन व्हेरीयंट मध्ये आहेत. त्यांच्या किमती १६.८५ लाखापासून २१.९५ लाखांपर्यंत आहेत. सुरवातीला ५ लाख रु. भरून बाईकचे बुकिंग करता येणार आहे.
बीएमडब्ल्यूच्या दोन नव्या दमदार बाईक भारतात लाँच
या बाईकच्या इंजिनमध्ये मोठा बदल केला गेला आहे. ते अधिक पॉवरफुल आहे आणि त्याचबरोबर काही नवी फिचर दिली गेली आहेत. या बाईकला १२५४ सीसी ट्वीन सिलेंडर बॉक्सर इंजिन दिले गेले असून एलइडी हेडलाईट व एलइडी डीआरएल दिले गेले आहेत. ६.५ इंची टीएफटी स्क्रीन दिला गेला आहे. बाईक इन्फर्मेशन देण्यासोबत म्युझिक व नेव्हिगेशनसाठी स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. आर जीएस स्टँडर्डची किंमत १६.८५ लाख असून प्रोची किंमत २०.०५ लाख आहे. अॅडव्हेन्चर स्टँडर्डची किंमत १८.२५ लाख असून प्रोची किंमत २१.९५ लाख रुपये आहे.
