रिलायन्स ई कॉमर्स क्षेत्रात करणार धमाकेदार एन्ट्री

ecommercere
देशातील बडी उद्योग कंपनी रिलायन्स आता ई कॉमर्स क्षेत्रात एन्ट्रीसाठी सज्ज असून त्यांचे ई कॉमर्स मॉडेल सर्वप्रथम गुजरात राज्यात लागू केले जाणार आहे. व्हायब्रन्ट गुजरात समिट मध्ये बोलताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या संदर्भात घोषणा केली. रिलायन्स इ कॉमर्स अमेझोनशी थेट स्पर्धा करणार आहे.

अंबानी म्हणाले, आमच्या या नव्या उद्योगाचा थेट फायदा १२ लाख दुकानदाराना होणार आहे. जिओ नेटवर्क ५ जी सेवा पुरविण्यासाठी तयार झाले आहे. जिओ, लहान मोठे दुकानदार मिळून एक नवीन प्लॅटफॉर्म तयार होईल आणि तो छोटे व्यापारी, दुकानदार आणि ग्राहक यांना एकमेकात जोडेल. फॅशन पासून फूड आणि इलेक्ट्रोनिक्स ते आर्थिक सेवा अश्या सर्व सेवा या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. तसेच जाहिरात व्यवसायही करता येणार आहे.

सध्या ५ हजार शहरात असलेल्या ५१०० जिओ पॉइंट स्टोरचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. यामुळे ज्या ग्राहकांनी कधीही इंटरनेटवर खरेदी केली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. रिलायन्सची जन्मभूमी आणि कर्मभूमी गुजरात आहे त्यामुळे या राज्याला आमची पहिली पसंती असून येथे आगामी १० वर्षात आम्ही ३ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहोत असेही अंबानी यांनी सांगितले.

Leave a Comment