भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; २ सेवकांसह एका तरुणीला अटक

bhayujji-maharaj
इंदौर- इंदौर पोलिसांनी बहुचर्चित भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर भय्यू महाराज यांच्या मृत्यूला जबाबदार धरत तीन जणांना अटक केली आहे. महाराजांचे खास सेवक विनायक दुधाने, शरद देशमुख आणि एका तरुणीचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भैय्यू महाराज यांना हे तीन आरोपी पैशासाठी मानसिक त्रास देत ब्लॅकमेल करत होते. भैय्यू महाराज यांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाचे गुढ पोलिसांना मिळालेल्या वेगवेगळ्या साक्षी पुराव्यांच्या आधारे उघड झाले. भैय्यू महाराज यांच्याकडून या तिन्ही आरोपींनी लाखो रुपये उकळले होते. तसेच पैसे न दिल्यास त्यांना बदनाम करण्याची धमकी देत होते.

इंदौरच्या फूटी कोठी येथील एका तरुणीची भय्यू महाराज यांच्याशी या प्रकरणातील आरोपी सेवकांनी ओळख करुन दिली होती. या तरुणीचा यानंतर प्रवेश थेट महाराजांच्या बेडरूममध्ये झाला होता. नुकतेच भय्यू महाराज यांच्या आईने देखील या तिघांना त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवले होते. या तीन आरोपींवर इंदौरच्या तेजाजी नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६, कलम १२० ब आणि खंडणी प्रकरणी ३८४ नुसार गुन्हे दाखल केले असून तिघांनी अटक करण्यात आली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment