संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

lucky
नुकताच लकी चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा थाटात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने बहार आली.

लकी चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच ट्रेलर लाँच सोहळ्याला चित्रपटाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणे ही दाखवण्यात आले. अभिनेते जितेंद्र कपूर यांना हे गाणे एवढे आवडले की, त्यांनी लकी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभय महाजनसोबत ‘कोपचा’ गाण्यावर ‘जितेंद्र स्टाइल’ डान्सही केला.

सिनेसृष्टीत यंदा डिस्को किंग बप्पी लाहिरींना 50 वर्ष पूर्ण होत असताना मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा पार्श्वगायक म्हणून लकी चित्रपटाच्या कोपचा गाण्याव्दारे डेब्यू झाला आहे. त्यानिमीत्ताने हा आनंद केक कापून साजरा करण्यात आला. ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरही उपस्थित होता.

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या चित्रपटागृहांमध्ये झळकणार आहे.

Leave a Comment