तुम्ही पाहिले आहे का ‘टोटल धमाल’चे नवे पोस्टर ?

total-dhamal
‘रेड’ चित्रपटानंतर अजय देवगनचा आगामी ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला लूक अलिकडेच रिलीज करण्यात आला होता. अजय देवगनसोबत यात हॉलिवूड सेंसेशन क्रिस्टलही दिसली. या चित्रपटाचे नवे कोरे पोस्टर आता रिलीज करण्यात आले आहे.


या चित्रपटाचे पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. यासोबत या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार याबद्दलही माहिती दिली आहे. या चित्रपटाचा येत्या २१ जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीला ‘टोटल धमाल’ हा रिलीज होणार आहे. यात अजय देवगन सोबत अनिल कपूर, माधुरी दिक्षीत, रितेश देशमुख, अरशद वारसी,जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि पीतोबाश हे कलाकारही झळकणार आहेत.

Leave a Comment