निलेश राणेंनी बाळासाहेंबवर केलेल्या आरोपांवर सोनू निगमची प्रतिक्रिया

sonu-nigam
गायक सोनू निगमचे नाव सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे चर्चेत आहे. बाळासाहेबांनी गायक सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. सोनू निगमला नुकतेच एका कार्यक्रमात यासंबंधी विचारण्यात आले सोनू निगमने त्यावेळी चेहऱ्यावर आगळे वेगळे भाव आणत पत्रकाराकडे पाहिले.

निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकाराने सोनू निगमला विचारले. सोनू निगमने यावर काही उत्तर दिले नाही मात्र चेहरा वेडावाकडा करत पत्रकाराकडे पाहिले आणि एक स्मितहास्य केले. सोनू निगमने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे त्याचे नेमके काय होते हे समजू शकले नाही.

Leave a Comment