अक्षय कुमार पुन्हा एकदा साकारणार खलनायकी भूमिका

akshay-kumar
गेल्या वर्षापासून एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूड गाजवत आहे. त्याची जी चर्चा सुरु झाली ‘पॅडमॅन’ या चित्रपटापासून, ती काही केल्या थांबत नाही. आता लवकरच त्याचा ‘केसरी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. तो या चित्रपटानंतर चित्रपट दिग्दर्शक एस.शंकर यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे. पण तो खलनायकाची भूमिका या आगामी चित्रपटामध्ये साकारणार आहे.

‘इंडियन २’ असे एस.शंकर यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून १९९४ सालच्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा हा चित्रपट रिमेक आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते. कमल हसन यांची ‘इंडियन २’ मध्येदेखील मुख्य भूमिका असून खलनायकाची भूमिका अक्षय साकारणार आहे.

अक्षयचा ‘इंडियन २’ हा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट आहे. अक्षयने यापूर्वी एस.शंकर यांच्या ‘२.०’ या दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. तो या चित्रपटातदेखील खलनायकाच्याच भूमिकेत झळकला होता. दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी प्रथम अजय देवगणला ऑफर दिली होती. पण अजयने चित्रपटासाठी काही कारणास्तव नकार दिला. या काळातच ‘२.०’चे चित्रीकरण सुरु होते. अक्षय आणि शंकर यांच्यात चित्रपटाच्या सेटवर चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर शंकर यांनी अक्षयला ‘इंडियन २’ चित्रपटात काम करण्याविषयी विचारले.

Leave a Comment