पूर्वसूचना न देता ‘या’ चित्रपटाच्या रिमेकमधुन तापसीचा पत्ता कट

tapasee-pannu
ऐंशीच्या दशकात आलेल्या आणि संजीव कुमार यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या ‘पती,पत्नी और वो’ चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून तापसी पन्नूची निवड करण्यात आली होती. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी तापसीने तारखा देखील उपलब्ध करुन दिल्या होत्या. पण ऐनवेळी तिला कोणतीही पूर्वसूचना न देता चित्रपटातून तिचा पत्ता कट करण्यात आला आहे. या सर्व मनमानी कारभारावर तिने नाराजी व्यक्त केली आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी मला या चित्रपटातून वगळले. त्यांनी पटेल असे एकही कारण मला दिले नाही. निर्मात्यांकडे विचारले असता त्यांनीही स्पष्टीकरण द्यायला नकार दिला. चित्रपटातून माझी गच्छंती का झाली याचे मला उत्तर हने आहे, असे म्हणत तापसीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. तापसीची गच्छंती केल्यानंतर तिच्या जागी अनन्या पांडेची वर्णी लागली असल्याचे समजत आहे.

Leave a Comment