नेटकऱ्यांनी अनुष्का शर्माला झाप झापले

anushka-sharma
रजनीगंधा पर्ल्सची अभिनेत्री अनुष्का शर्मा ब्रँड अम्बॅसेडर बनली असून याची घोषणा काही दिवसापूर्वी झाली होती. तिने आता आपल्या ट्विटर हँडलवर जाहिरातीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण तिचे रजनीगंधा प्रॉडक्ट्सचा ब्रँड अम्बॅसेडर होणे नेटीझन्सना आवडलेले नाही. या व्हिडिओसोबत अनुष्काने सोशल मीडियावर लिहिले आहे, “लेट गॉडेस शाईन ! अच्छे की चमक…सिल्वर पर्ल्स रजनीगंधा पर्ल्स. परंतु तिने हा व्हिडिओ पोस्ट करताच तिच्या टीकेचा भाडीमार होण्यास सुरुवात झाली.

अनुष्का या व्हिडिओमध्ये रॅम्पवॉक करताना तिच्या सहकलाकाराचा कपडा सरकतो. तिची होणारी फजिती वाचवण्यासाठी अनुष्का तिच्या पाठीवर हात ठेवते आणि वेळ मारुन नेताना दाखवले आहे. ती त्यानंतर रजनीगंधा मसाला खाताना दाखवण्यात आली आहे. नेमके हेच नेटीझन्सना खटकले आहे. यावर एक युजर म्हणतो की, एवढाच करणे आता बाकी राहिले आहे…कोहलीपासून काही तरी शिक..आरोग्यास हानिकारक असे लिहिलेल्या पदार्थांचा तो कधीच प्रचार करीत नाही. दुस-या एका युझर्सने म्हटले आहे की, तुझ्यासारखी मुलगी फक्त बोलते पण असल्या जाहिराती करते. पेटा पुरस्कार मिळाला हे फक्त दाखवण्यासाठी असते. असल्या पदार्थांचा प्रचार करुन खरे काय ते दाखवलेस. देव तुझे भले करो. आणखी एकाने लिहिले आहे की, रोल मॉडेल सेलिब्रेटी म्हणून कृपया अशा उसण्या जाहिरातींना प्रोत्साहन देऊ नकोस.

Leave a Comment