हार्दिक-राहुलची सौरव गांगुलीकडून पाठराखण

saurav-ganguly
मुंबई – निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बचाव केला आहे. त्याने यावेळी म्हटले, की चुका लोकांकडुन होतात पण प्रत्येकाला यातून पुढे जाताना हे निश्चित केले पाहिजे की अशा चुकानंतर होणार नाहीत.

याप्रकरणावर गांगुली म्हणाला, तो भाग मी पाहिला नाही. माझ्या मते फक्त नवीन क्रिकेटपटूंनीच चांगले वर्तन करावे असे तुम्ही ग्राह्य धरु शकत नाही. लोकांकडून चुका होतात. या चुका पुढे घेवून आपल्याला जायचे नाही. ज्याने असे केले त्याला याची जाणीव झाली असणार, असा मला विश्वास आहे. आता तो नक्कीच एक चांगला माणूस बनेल. आपण माणूस आहोत मशीन नाही. आपल्याकडून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होईल, असे ग्राह्य धरता येत नाही. तुम्ही स्वत:ही जगले पाहिजे आणि इतरांनाही जगू दिले पाहिजे.

कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर हार्दिक-राहुलवर टीकेची झोड उठली होती. याची दखल घेताना बीसीसीआयने दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून चौकशीसाठी माघारी बोलवले होते. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment