कृष्ण कुमार, भूषण कुमार यांच्या विरोधातील तक्रार ‘त्या’ महिलेने घेतली मागे

combo
एका महिलेने टी-सिरीजचे मालक आणि चित्रपट निर्माता कृष्ण कुमार आणि भूषण कुमार यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर काही तासातच आपली तक्रार मागे घेतली आहे. आपण असे निराशा आणि उदासिनतेमुळे खोटे आरोप केल्याचे महिलेने म्हटले आहे.

आरोप मागे घेतल्याचे महिलेने सांगितले असले तरी याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. कृष्ण कुमार आणि भूषण कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महिलेने मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. कृष्ण कुमार यांनीदेखील या महिलेच्या विरोधात अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. दोघांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्याचे महिलेने एका पत्रात म्हटले आहे. हे पत्र न्यूज एजन्सीकडे आहे. तिने कृषण कुमार यांनाही तक्रार मागे घेण्याबद्दल विनंती केली आहे.

Leave a Comment