आपल्या रिलेशनशिपबाबतची अंकिताने दिली कबुली?

ankita-lokhande
प्रेक्षकांच्या मनावर ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतील सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या जोडीने राज्य केल्यानंतर रिअल लाईफमध्येदेखील ही जोडी लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा होत्या. पण या जोडीच्या लग्नाविषयीच्या बातम्यांना उधाण येत असतानाच ही जोडी विभक्त झाल्यानंतर सुशांत क्रिती सेनॉन तर अंकिता विकी जैन या व्यावसायिकासोबत रिलेशनशिपमध्ये अडकली.

अद्यापही विकीसोबतच्या नात्याविषयी अंकिताने अधिकृत घोषणा केलेली नाही. तिला अशात याबद्दल प्रश्न विचारला असता, विकी एक खूप चांगला मुलगा आहे. तो एक व्यावसायिक आहे. होय, मी त्याच्या प्रेमात आहे आणि वेळ आल्यावर सर्वांना याबद्दलची माहिती नक्कीच देईल, असे उत्तर अंकिताने दिले आहे.

अंकिताचा सध्या लग्नाविषयी काय विचार आहे? असे विचारले असता, याबद्दल विचार करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल. मी सध्या माझ्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. माझ्या आयुष्यात लग्न ही गोष्ट खरच महत्त्वाची आहे आणि योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच याबद्दल कळवेल, असेही अंकिताने म्हटले. अंकिता आता आपल्या रिलेशनशिपविषयी अधिकृत घोषणा कधी करणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment