शहिद जवानांच्या पत्नींना रॉनी स्क्रूवाला देणार १ कोटी रूपये

Ronnie-screwala
काही दिवसांपूर्वीच उरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. प्रेक्षकांचा सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात ५० कोटीचा आकडा पार केला आहे. अशात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटाच्या कमाईतील १ कोटी रूपये शहीद सैनिकांच्या पत्नीला देण्याचा निर्णय चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी घेतला आहे. सर्वांकडूनच त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. भारतीय सैन्याचे शौर्य आणि सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून पडद्यावर उलगडण्यात आला आहे.

विकी कौशलने या चित्रपटात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाला सोशल मीडियावर चाहते भरभरून दाद देत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. चित्रपटात विकी कौशलशिवाय यामी गौतम, मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी यांच्याही महत्तवाच्या भूमिका आहेत.

Leave a Comment