पंतप्रधानांच्या भेटीला बॉलीवूडचा ‘लखन’

anil-kapoor
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलीवूडचा ‘लखन’ म्हणजेच अभिनेता अनिल कपूरने भेट घेतली. याबाबतची माहिती ट्विटरवरुन देताना आपल्या मनातील भावना अनिल कपूर यांनी व्यक्त केल्या आहेत. आपण मोदींच्या भेटीने प्रभावित झाल्याचे त्याने म्हटले आहे.


ट्विटरवर अनिल कपूरने लिहिले आहे कि, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मला संधी मिळाली. मी त्यांच्याशी झालेल्या बातचीतीमुळे प्रेरित झालो आहे. त्यांचा दूरदृष्टीपणा आणि करिश्मा प्रभाव पाडणारा आहे. खासगी भेटीची संधी त्यांनी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

ट्विटरवर अनिल कपूर यांनी एक फोटो पोस्ट केला असून ते त्यात मोदी यांना अभिवादन करताना दिसत आहेत. गेल्या आठवड्या सिनेजगतातील करण जोहर, रणवीर सिंह, रणवीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली होती. सिने तिकीटांवरील जीएसटी कमी केल्याबद्दल त्यांनी मोदींची भेट घेऊन आभार मानले होते.

Leave a Comment