‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या ‘भारत’चा टीझर

salman-khan
बऱ्याच काळापासून सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘भारत’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानच्या ‘रेस-३’ चित्रपटाला पाहिजे तसे यश न मिळाल्यामुळे ‘भारत’ चित्रपटातून सलमानने पुन्हा दमदार एन्ट्री करण्याचे ठरविले आहे. या चित्रपटाची चाहत्यांनाही त्याच्या उत्सुकता आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे अपडेट्स नेहमी दिग्दर्शक अली अब्बास जफर हे चाहत्यांशी शेअर करत असतात. सलमान या चित्रपटात वेगवेगळ्या रूपात दिसणार आहेत. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, २६ जानेवारीला या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे.


ट्विटरवर निर्माता अतुल अग्निहोत्रीने ‘भारत’ चित्रपटाच्या टीझरची एक झलक शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत अतुल अग्निहोत्रीने काऊंचडाऊन बिगीन्स’ असे कॅप्शन दिले आहे. तिसऱ्यांदा सलमान खान आणि कॅटरिना हे अली अब्बास जफरसोबत काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात काम केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता ‘भारत’ चित्रपटातही दोघांची जोडी झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment