कन्हैया कुमार सीपीआयकडून लोकसभा निवडणूक लढवणारच

kanhiya-kumar
नवी दिल्ली – कन्हैया कुमारला लालूंचा राष्ट्रीय जनता पक्ष देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल झाल्यामुळे समर्थन देणार नसल्याच्या वृत्ताचे सीपीआयने खंडन केले आहे. सीपीआयकडून बेगुसराय मतदारसंघातून येणारी लोकसभा निवडणूक कन्हैया कुमार लढवणार असून आम्हाला राष्ट्रीय जनता दलाचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

सीपीआय बेगुसरायमधून कन्हैया कुमार आणि उजिरपूरमधून रामदेव वर्मा यांना महाआघाडीचा उमेदवार म्हणून उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीपीआय नेते यासाठी लालू प्रसाद यादव यांची रांची तुरूंगात भेट घेणार आहेत. ते यावेळी लालू प्रसाद यादव यांच्याशी बिहारमधील राजकीय परिस्थिती आणि येणाऱ्या लोकसभेसाठीच्या रणनीतीची चर्चा करतील.

दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारविरुद्ध ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूच्या आवारात देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल तब्बल १२०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. देशद्रोहासारखा गंभीर आरोप झाल्यामुळे कन्हैया कुमारला उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रीय जनता दल अनुकूल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या आरोपपत्राचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नसून बेगुसरायमधून कन्हैयाच निवडणूक लढवेल, असा दावा सीपीआयने केला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment