महिलांच्या कौमार्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्राध्यापकाची हकालपट्टी

professor
कोलकाता – कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची महिलांच्या कौमार्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. मोठा वाद जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांच्या फेसबुक पोस्टमुळे निर्माण झाला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये महिला आयोगाकडून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांनी लिहिले होते की, वधू कुमारी का नाही? कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेले असेल तर तुम्हाला चालेल का ? त्याबरोबर अशी मुले मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा माहिती नसतो.

कनक सरकार यांनी एवढ्यावर न थांबता पुढे म्हटले की, मुलगी जन्माला आल्यापासून तोपर्यंत सील्ड असते, ते जोपर्यंत उघडले जात नाही. कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्य तसेच लैंगिक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. कुमारी वधू अनेक मुलांसाठी एखाद्या परीप्रमाणे असते.

कनक सरकार यांना हटवण्याची मागणी आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अभ्यास करणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या समितीने केली होती. यानंतर त्यांना विद्यापीठात येण्यापासून रोखण्यात आले आहे. विद्यापीठाची प्रतिमा कनक सरकार यांच्या वक्तव्यामुळे मलीन झाल्याची प्रतिक्रिया कुलुगरु सुरंजन दास यांनी दिली आहे.

Leave a Comment