राज्यातील छम छम पुन्हा सुरू होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

dance-bar
नवी दिल्ली: राज्य सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेले अनेक नियम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे डान्स बार बंद सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार चालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही अटींच्या आधारे बार सुरू करण्यास परवानगी दिली. याआधी न्यायालयाने डान्स प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. राज्य सरकारनं डान्स बार संदर्भात केलेल्या कायद्याची माहिती सुनावणी दरम्यान न्यायालयाला दिली होती. या कायद्यामुळे अनेक बेकायदा गोष्टी आणि महिलांचे शोषण रोखता येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. मात्र सरकारने घालून दिलेले अनेक नियम न्यायालयानं रद्द केले. मुंबईत डान्स बार संध्याकाळी 6 ते 11.30 पर्यत चालू ठेऊ शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारे सीसीटीव्ही गरज नसल्याचे यामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment