आघाडीच्या अभिनेत्रीं एवढेच मानधन घेते क्रिस्टल माकडीण

cystal
बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला. या फर्स्ट लुकमध्ये अजयच्या खांद्यावर एक माकडीण ऐटीत बसल्याचे आपण सगळ्यांनीच पाहिले. या माकडीणीचा थाट बघितल्यावर असे वाटते कि एखादी साधीसुधी ही माकडीण नसुन हॉलिवूडमधील नावाजलेली अॅनिमल सेलिब्रिटी असल्याचे समोर आले आहे.
cystal1
हॉलिवूडमध्ये ‘क्रिस्टल’ या नावाने ‘टोटल धमाल’च्या फर्स्ट लूकमध्ये दिसत असलेली ही माकडीण प्रसिद्ध आहे. तिचा मागील २३ वर्षांपासून सिनेक्षेत्रात वावर आहे. कॅपुचिन या जातीची ‘क्रिस्टल’ असून ती सध्या हॉलिवूडमधील नावाजलेली अॅनिमल अॅक्ट्रेस आहे. आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले असून ती ‘टोटल धमाल’च्या माध्यमातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
cystal2
क्रिस्टल एक ट्रेंड मंकी असून ती सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरते. त्याचबरोबर ती दैनंदिन जीवनातील कामही सराईतपणे करताना दिसते. माणसांनी बोललेल्या गोष्टींचे तिला आकलन होऊन ती त्यावर तिची प्रतिक्रियाही देत असते. तिच्या याच वैशिष्ट्यामुळे तिची अमेरिकेतील अनेक न्युज चॅनेल्सने मुलाखत घेतली आहे. ‘हँग ओव्हर २’, ‘जॉर्ज ऑफ जंगल’, ‘नाईट अॅट ए म्युझिअम’ या साऱ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये क्रिस्टलने काम केले आहे. ती या चित्रपटामध्ये उत्तम अभिनय केल्यामुळे लोकप्रिय झाली आहे. ती तिच्या याच लोकप्रियतेमुळे एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणेच मानधन घेत असून क्रिस्टलने आठ वर्षापूर्वी एका मालिकेच्या प्रत्येक भागासाठी सात लाखाहून अधिक मानधन घेतल्याचे ‘टीव्ही गाईड मॅगझीन’मध्ये म्हटले होते.

Leave a Comment