कायलीला मागे टाकलेल्या या अंड्याने मोडला चक्क ‘डेस्पासितो’ गाण्याचाही विक्रम

egg
सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटीपेक्षाही एका अंड्याची सर्वाधिक चर्चा आहे. कायली जेनर सारख्या इन्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या मॉडेलचा विक्रम या अंड्याने मोडला तेव्हापासून हे अंडे जणू सेलिब्रिटीच बनले आहे. आता या अंड्याने चक्क ‘डेस्पासितो’ गाण्याचाही विक्रम मोडला आहे.


२०१७ मधील युट्युबवरील सर्वाधिक पाहिले गेलेले ‘डेस्पासितो’ गाणे होते. तसेच युट्युबवर या गाण्याला सर्वाधिक लाइक्सही होते. या व्हिडिओला जवळपास ३ कोटीहून अधिक लाइक्स आहेत. ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’ने या लाइक्सचा विक्रमही मोडला आहे. जानेवारीला सुरु झालेल्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील या पोस्टला आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख लाइक्स मिळाले आहेत. हे लाइक्स ‘डेस्पासितो’ गाण्याला असलेल्या लाइक्सच्या संख्येपेक्षा दीड कोटींहून अधिक आहे.

Leave a Comment