महेश मांजरेकरांना बनवायचा आहे ‘नामदेव ढसाळां’वर आधारित बायोपिक

mahesh-manjarekar
बायेपिकचे हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने पीक आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाग मिल्खा भाग, मेरी कोम पासून सुरु झालेला हा प्रवास मंटोपर्यंत आणि मराठीत भाईपर्यंत पोहोचला आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक, सिंधुताई सपकाळ, प्रकाश बाब आमटे यांच्यावर आधारित बायोपिक मराठीमध्ये झाले आणि गाजलेदेखील. आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नामदेव ढसाळ यांच्यावर बायोपिक येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

मांजरेकरांनी एका टीव्ही शोमध्ये बोलताना आपल्या नव्या संकल्पाबद्दल सांगितले. मांजरेकरांना भाई चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या बायेपिकबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. मराठीत नामदेव ढसाळ यांच्यावरील चित्रपट बनवायला आवडेल असे ते म्हणाले. या चित्रपटाचे नाव पँथर असेल, असेही ते म्हणाले.

या चित्रपटावर महेश मांजरेकर यांनी खोलवर विचार केल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. किशोर कदम यांनी नामदेव ढसाळ यांची भूमिका करावी असे त्यांना वाटते. ढसाळ हे कवी होते तसेच किशोर कदमही कवी आणि उत्तम अभिनेता असल्यामुळे ही व्यक्तीरेखा जास्त प्रभावी होईल असे त्यांना वाटते.

मांजरेकरांनी बोलून दाखवलेला ढसाळांच्या बायोपिकचा विचार प्राथमिक असला तरी हा बायोपिक व्हावा असे ढसाळांच्या तमाम चाहत्यांना वाटत आहे. मांजरेकर हा बायोपिक करणार की, ही संकल्पना दुसराच कोणी दिग्दर्शक राबवणार हे येणार काळच ठरवेल.

Leave a Comment