धीरूभाई अंबानींची व्यक्तिरेखा साकारणार वरुण धवन ?

varun-dhawan
अभिनेता वरुण धवन हा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटात धीरूभाई अंबानींच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ‘भारत’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. सलमानव्यतिरिक्त या चित्रपटात कतरिना कैफ, दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे. पण वरुण धवनही या चित्रपटात या स्टारकास्टसोबतच छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे.

धीरुभाई अंबानींच्या भूमिकेत वरुण या चित्रपटात दिसेल अशी चर्चा आहे. वरुण तरुणपणीच्या काळातील धीरुभाईंची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ‘भारत’च्या चित्रीकरणाला गेल्यावर्षी जून महिन्यात सुरूवात झाली. माल्टा, अबुधाबी, लुधियाना, मुंबई अशा विविध ठिकाणी सध्या ‘भारत’चे चित्रीकरण सुरू आहे.

कोरिअन चित्रपट ‘ओडे टु माय फादर’ चित्रपटावर आधारित अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ हा आहे. या चित्रपटातील कथेबद्दल खूपच गुप्तता पाळण्यात येत आहे. या चित्रपटात ७० वर्षे जुना भारत पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment