
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर राज ठाकरे यांनी आज मकर संक्रांतीचे निमित्त साधून व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. थापांचे पतंग पंतप्रधान मोदी उडवत असल्याचे राज यांनी व्यंगचित्र रेखाटले होते. आता त्याला भाजपनेही प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणजे एक कटी पतंग असल्याचा बोचरा टोला भाजपने लगावला आहे.
राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचा प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून टोला
राज: एक ‘कटी पतंग’ … @ANI @PTI_News pic.twitter.com/MafbKmcAmJ
— भाजप महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 15, 2019
राज ठाकरेंकडे असलेले सगळे मुद्दे आता वापरून संपले आहेत.तरीही बाता आणि थापा बोलघेवड्याच्या सुरूच असल्याचे भाजपने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात म्हटले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे ‘राज: एक कटी पतंग’ असा उल्लेख असलेला पतंग उडवत आहेत आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचे तुटलेले पतंग खाली पडले आहेत. तसेच शरद पवार आणि काही नमोरुग्ण त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवले आहे.
