मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार शत्रुघ्न सिन्हा

shatrughan-sinha
नवी दिल्ली – आता थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान देण्याचे भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ठरवले आहे. शत्रुघ्न सिन्हा आगामी लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढवणार असल्याचे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अधिकृत बंड सिन्हा करणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

त्यांनी यावेळी भाजपवर कडाडून टीका केली आहे. आधी लोकशाही पक्षात होती, पण आता हुकूमशाही असल्याचे ते म्हणाले. मी नेहमी खरे बोलतो आणि बोलत राहील असे सांगायलाही सिन्हा विसरले नाहीत. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, की पक्षाच्या विरुद्ध मी कधी बोलत नाही. फक्त पक्षाला आरसा दाखविण्याचे काम करतो. त्यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुतीही केली. ते म्हणाले, की राहुल गांधींमध्ये फार कमी वेळेत परिपक्वता आली आहे. इतर पक्षांच्या अध्यक्षांनी त्यांच्याकडून हे शिकायला हवे.

पुढे ते म्हणाले, की नेहमीच मी गांधी कुटुंबाचा चाहता राहिलो आहे. जवाहरलाल नेहरूंपासून सोनिया गांधींपर्यंतचा मी प्रशंसक आहे. आता राहुलचा देखील प्रशंसक असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. आगामी निवडणूक वाराणसीमधून लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment