लवकरच बॉक्सरच्या भूमिकेत अभिनेता तसेच दिग्दर्शक असलेला फरहान अख्तर हा झळकणार आहे. तो दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत ६ वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटात काम करणार आहे. त्याने मेहरा यांच्यासोबत ‘रंग दे बसंती’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. दोघेही आता पुन्हा एकदा बॉक्सिंगवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.
‘तुफान’साठी फरहान बनणार बॉक्सर
‘तुफान’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. फरहान या चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. फरहान आणि रितेश सिंधवानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट कोणाचाही बायोपिक नाही. या चित्रपटाची कथा अंजुम राबाबली या लिहित आहेत. चित्रपटाची तयारी सुरू झाली असून फरहान बॉक्सरच्या भूमिकेसाठी बॉक्सिंगचे प्रशिक्षणही घेत असल्यामुळे आता ‘मिल्खा’नंतर तो बॉक्सिंगची भूमिका कशाप्रकारे साकारतो, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.